मुंबई जवळील भिवंडी शहरात कोरोना पाठोपाठ सारी या आजाराने डोके वर काढले

गुरूवार, 25 जून 2020 (08:28 IST)
राज्याची राजधानी मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाबाबत मुंबईत ही स्थिती असतानाच आता आणखी एक आजार मुंबईच्या वेशीपर्यंत येऊन ठेपलेला आहे. मुंबईजवळील भिवंडी शहरात कोरोना पाठोपाठ सारी या आजाराने डोके वर काढले असून आता पर्यंत स्व. इंदिरा गांधी कोविड -19 शासकीय रुग्णालयात सारी आजाराचे 231 रुग्ण दाखल झाले त्यापैकी 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 190 कोरोनाबाधित दाखल होऊन त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची  धक्कादायक माहिती  समोर आलेली आहे.
 
त्यामुळे साहजिकच कोरोनापेक्षा सारीचे रुग्ण अधिक असून मृतांची संख्याही अधिक असताना त्यासाठी भिवंडीत वेगळी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात शासन पातळीवर अजूनही कोणतीही उपाययोजना होत नसल्याने येथील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आयजीएम या रुग्णालयातही 2 डॉक्टर्स , 7 परिचारिका ,2 रुग्णवाहिका चालक व 4 कर्मचारी अशा रुग्णालयातील 15 जणांना कोरोना बाधा झाल्याने येथील रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात येथील व्यवस्था कमी पडत असून त्याकडे शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी करण्यात येत आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती