अमिताभ यांचा नवा विडीओ, पाहा कोरोनाबद्दल काय सांगतात ते

Webdunia
गुरूवार, 26 मार्च 2020 (08:49 IST)

करोना विषाणूची जनजागृती करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी  ट्विटरवर  एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी मानवी विष्ठेवर माशी बसून करोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो, असे सांगितले आहे.

हा दावा करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी द लांसेट या सर्वेक्षणाचा हवाला दिला आहे. चीनच्या एका अभ्यासानुसार मानवी विष्ठेत करोना व्हायरस जिवंत राहू शकतो, असे निदर्शनास आले होते. जर या विष्ठेवर जर माशी बसली तर हा विषाणू आणखी वेगाने पसरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन शौचालयाचा वापर करत मोकळ्या जागेवर शौचास बसणे सोडले पाहीजे, असे आवाहन केले आहे.  तसेच कोरोनाला दूर ठेवण्यासाठी हात धुणे, सोशल डिस्टसिंग सारखे पर्याय लोकांनी वापरावेत, असेही सांगितले आहे.
 

संबंधित माहिती

पुढील लेख