सनदी अधिकारी अभिषेक सिंह यांची मुख्य भूमिका असलेला लघुपट 'चार पंद्रह' आंतरराष्ट्रीय ओटीटी प्लेटफॉर्मवर होतोय ट्रेंड !

शुक्रवार, 26 जून 2020 (20:43 IST)
केवळ दीड लाखात, मसुरीतील चित्रपट शिबिरात ७२ तासांच्या विक्रमी वेळेत नवशिक्या विद्यार्थ्यांनी बनवलेला चित्रपट
ही काही सामान्य गोष्ट नाही जेव्हा एखादा सनदी अधिकारी अभिनयाच्या क्षेत्रात पाय ठेवतो आणि सध्या, दिल्लीमध्ये डेप्युटी कमिश्नर पदावर कार्यरत असलेले अभिषेक सिंह यांनी लघुपट 'चार पंद्रह' मधून हे केले आहे. लघुपटात अभिषेक नायक देबाशीषची व्यक्तिरेखा साकारत आहेत. याची कहाणी पति पत्नी यांच्यामधील नात्याला अधोरेखित करते. ही आकर्षक कहाणी दर्शकांना खिळवून ठेवते कारण त्यातील प्रत्येक वळणावर एक नवा ट्विस्ट येतो. या लघुपटाचा आणखी एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे हा लघुपट पूर्णपणे विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे. मसुरी येथील एका शिबिरात ७२ तासांच्या विक्रमी वेळेत नवशिक्या शिबिरार्थींनी बनवलेला हा एक प्रयोगात्मक लघुपट आहे. केवळ दीड लाखाच्या बजेटमध्ये शूटपासून पोस्ट-प्रोडक्शनपर्यंत सर्व बाबी या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे हाताळल्या आहेत.
 
'चार पंद्रह' ला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, डिज्नी+ हॉटस्टार सारख्या आंतरराष्ट्रीय ओटीटी मंचाने या चित्रपटासाठी या विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधला. जगभरातील प्रेक्षक कौतुक आणि प्रोत्साहन देत या विद्यार्थ्यांना फोन आणि ईमेल करत आहेत. विचारांना उत्तेजन देणाऱ्या नरेशनवर आधारित हा लघुपट "चार पंद्रह', मुंबई शॉर्ट्स इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल, भारताचा 50वा गोवा अंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि इतर अनेक प्रमुख चित्रपट महोत्सवात हा लघुपट दाखवण्यात आला आहे. अभिषेक सिंह यांची व्यक्तिरेखा दर्शकांसाठी एक पर्वणी आहे कारण आपण लवकरच रिअल लाईफ कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला समीक्षकांनी गौरविलेल्या 'दिल्ली क्राइम'च्या दुसऱ्या भागात रील-लाइफ पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहणार आहोत.
 
सध्या, दिल्लीमध्ये डेप्युटी कमिश्नर पदावर कार्यरत असलेले अभिषेक सिंह याविषयी बोलताना म्हणाले की,“या लघुपटाची शूटिंग माझ्यासाठी अगदी खास आणि अविस्मरणीय अनुभव होता कारण आम्ही माझ्या प्रतिष्ठित आयएएस ट्रेनिंग एकेडमीजवळ शूट केले आहे जिथून मी पास आउट झालो होतो. आम्ही मसूरीमध्ये संपूर्ण शूट केवळ 3 दिवसात पूर्ण केले. विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि उत्साह उल्लेखनीय आहे. मला वाटते की या प्रॉजेक्टमध्ये सर्वात चांगली गोष्ट ही आहे की विद्यार्थ्यांद्वारे कमीत कमी 1.5 लाख बजेट मध्ये हा लघुपट करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे एकूणच आपल्या कलेविषयीचे समर्पण कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांदारे बनवण्यात आलेला प्रयोगात्मक लघुपटाला अशा पद्धतीने कौतुक आणि ओळख मिळणेच याची विशेषता सिद्ध करणारे आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती