दक्षिण चित्रपटसृष्टीतून एकामागून एक दुःखद बातम्या येत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक दक्षिण कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्याच वेळी, सुप्रसिद्ध तमिळ अभिनेता, विनोदी कलाकार, संगीतकार आणि टीव्ही कलाकार एस. कृष्णमूर्ती उर्फ मदन बॉब यांचेही निधन झाले आहे.
मदन बॉब यांनी काल रात्री वयाच्या 71 व्या वर्षी चेन्नई येथे अखेरचा श्वास घेतला. ते बराच काळ कर्करोगाशी झुंज देत होते. बराच काळ आरोग्याच्या समस्यांशी झुंज दिल्यानंतर, शनिवारी रात्री त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने दक्षिण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मदन बॉब यांनी1984 मध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना नेंगल केट्टावाई 1984), वानामे एलाई (1992) आणि थेवर मगन सारख्या चित्रपटांमधून ओळख मिळाली. नंतर त्यांनी अनेक हिट कॉमेडी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या. त्यांनी रजनीकांत, कमल हासन, विजय, सूर्या आणि अजित सारख्या मोठ्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली होती.