सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हॉटस्टारवर २४ जुलै ला प्रदर्शित होणार

गुरूवार, 25 जून 2020 (22:00 IST)
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सुशांतचा शेवटाचा चित्रपट ‘दिल बेचारा’च्या प्रदर्शनाची तारीक ट्विटरद्वारे सांगितली आहे. ‘सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टारवर २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.तसेच हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन नसलेल्या प्रेक्षकांनाही पाहता येणार आहे. 
 
मुकेश छाब्रा दिग्दर्शित ‘दिल बेचारा’ या चित्रपटात सुशांत मुख्य भूमिकेत आहे. तसेच अभिनेत्री संजना सांघी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजना या चित्रपटाच्या निमित्ताने कलाविश्वात पदार्पण करणार आहे. तसेच अभिनेता सैफ अली खानदेखील या चित्रपटात पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे जुलै २०१८मध्ये चित्रीकरण सुरु झाले होते. तसेच हा चित्रपट जॉन ग्रीक यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती