प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्या मुलाच्या कारला अपघात

शुक्रवार, 26 जून 2020 (08:32 IST)
अभिनेता गोविंदाचा मुलगा यशवर्धन अहुजा याच्या गाडीचा मुंबईतील जुहू परिसरात अपघात झाला. यशवर्धनच्या कारला दुसऱ्या एका कारने धडक दिली.अपघातावेळी गोविंदाचा मुलगा यशवर्धन गाडी चालवत होता आणि दुसरी कार कंपनीचा चालक चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने या अपघातात कोणीच जखमी झाले नसून यशवर्धनच्या कारच्या हेडलाइटचं नुकसान झालं आहे.
 
जुहू येथे रात्री 8.30च्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे. यावेळी कारमध्ये गोविंदा नव्हते. मात्र गोविंदा यांचा मुलगा कारमध्ये होता. कार अपघातात कोणलाही दुखापत झाली नाही. मात्र कारचं काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.गोविंदा यांना टीना आणि यशवर्धन अशी दोन मुलं आहेत. लॉकडाउनच्या काळात ते कुटुंबीयांसोबतच वेळ घालवत आहेत. यशवर्धनने लंडनमध्ये फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलं. त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत चर्चा आहे. मात्र अद्याप त्याबाबत काही ठोस माहिती नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती