किआचा नवा लूक

गुरूवार, 25 जून 2020 (11:26 IST)
किआ मोटर्स(Kia Motors) ने नेक्स्ट जनरेशन किआ कार्निवाल MPV टीझर लाँच केला आहे. ही कार या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत लाँच होणार आहे. नवीन एव्हीपी भारतीय बाजारात सध्याच्या कार्निवाल मॉडेलची रिप्लेस करणार आहे. कंपनीने या वर्षी फेब्रुवारीत भारतात या कारचे फर्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केले होते. भारतात या कारला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता कंपनी याचे सेकंड जनरेशन मॉडेल आणत आहे. नवीन कार्निवालची डिझाइन ऑनगोईंग मॉडेलपेक्षा खूप वेगळी असणार आहे. 
 
किआ कार्निवालचे फर्स्ट लूक मॉडेल फेब्रुवारी 2020 मध्ये लाँच करणत आले होते. किआ कार्निवाल मध्ये दुसर्‍या लाइन पॉवरसाठी  स्लाडिंग दरवाजे दिले आहेत. त्यामुळे  मिनी व्हॅन सारखा फील येतो. याच्या फ्रंटमध्ये किआची सिग्रेचर ग्रील आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकल्या जाणार्‍या कार्निवालचा लूक खूप जबरदस्त आणि प्रीमियम आहे. 
 
नवीन किआ कार्निवालच नेक्स्ट जनरेशन मॉडेलला कंपनीने नवीन डिझाइन लँग्वेज सोबत उतरवण्याची योजना बनवली आहे. कंपनीने याला सिंफनिक आर्किटेक्चर नाव दिले आहे. नवीन कार्निवालचा स्टांस आधीपेक्षा जास्त आहे. यामुळे कारमध्ये मोठ्या व्हील्जचा वापर करण्यात आला आहे.
 
किआ सॉनेटच लाँचिंगची उत्सुकता
भारतात किआ सॉनेट एसूव्हीच्या लाँचिंगची उत्सुकता निर्माण झाली आहे. किआ एसूव्हीमध्ये 3 इंजीन ऑप्शन देण्यात आली आहेत. 1 लीटर पेट्रोल इंजीन, 1.2 लीटर पेट्रोल इंजीनआणि 1.5 लीटर डिझेल इंजीन असे पर्याय आहेत. कारचे 1.0 लीटर इंजीन 118 बीएचपीचे पॉवर, 1.2 लीटर पेट्रोल इंजीन 82 बीएचपीचे पॉवर आणि 1.5 लीटर डिझेल इंजीन 99 बीएचपीचे पॉवर जनरेट करते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती