मान्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात दाखल होणार

रविवार, 14 जून 2020 (09:44 IST)
मान्सून आता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ  येथील उर्वरित भागात दाखल झाला. या व्यतीरिक्त छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारच्या काही भागात दाखल झाला आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल आहे. येत्या २४ तासांत मान्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात दाखल होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
 
 येत्या ४८ तासांत कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. विदर्भ  येथ मुसळधार पाऊस कोसळेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस कोसळेल. पश्चिम किनारी ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील. मच्छिमारांनी समुद्रात उतरु नये असं आवाहन हवामान खात्याने केले आहे.
 
येत्या २४ तासांत संपुर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल.  कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे मुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती