एजाज खानने करुन दिली ’लक्ष्मण रेषे’ची आठवण

Webdunia
रविवार, 22 मार्च 2020 (16:43 IST)
देशभरात करोना व्हायरस पसरत असून आता सर्वांची काळजी वाढत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले असून बॉलिवूड कलाकार देखील याचे पाळन करण्याचा आवाहन करत आहेत. 
 
नुकताच बॉलिवूड अभिनेता एजाज खानने देखील ट्विट करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे कारण त्याने या रामयाणातील संदर्भ दिला आहे. 
 
एजाज खानने ट्विट केले की ‘लक्ष्मण रेषा सर्वांसाठी होती, सीतेसाठी आणि रावणासाठी देखील. दोघांनीही तिचे उल्लघन केले. त्यानंतर काय झाले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. आपण देखील आपल्या लक्ष्मण रेषेच्या आत रहा आणि करोना नावच्या रावणापासून स्वत:चे रक्षण करा’. 
 

संबंधित माहिती

पुढील लेख