रेल्वे प्रशासनाने 2018 मध्ये विशेष पर्यटन ट्रेनचे चार पॅकेज दिले होते. मागी वर्षाप्रमाणे या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोन पॅकेज येतील. भारतीय स्थळांसाठी 16 दिवस आणि 17 रात्रीचा एकूण खर्च प्रवश्यांना 16,065 जमा करावा लागणार असून श्रीलंकेसाठी 36, 950 रुपये प्रती व्यक्ती आकाराले जातील.
भारत आणि श्रीलंकेमधील रामाशी जोडलेल्या सर्व स्थळांना भेट देण्यासाठी या खास रेल्वेचा उपक्रम सुरु आहे. आयोध्या, हनुमान गढी, नंदीग्रामाचे मंदिर, सतीमाढी, तुलसी मानस मंदिर आणि संकट मोचन मंदिर, रामकोट, कनक भवन मंदिर, जनकपूर, वाराणसी, प्रयाग श्रृंगवेरपूर, चित्रकूट, नाशिक, हम्पी आणि रामेश्वर याठिकाणी जाईल. त्यानंतर ज्यांना श्रीलंकेतील रामाची स्थळे पाहायची आहेत त्यांना विमानाने त्याठिकाणी नेण्यात येईल.
श्रीलंकेत कँडी, नुवारा एलिया, कोलंबो, नेगोंबो येथे रामायण काळातील संबंधित स्थळांचे दर्शन घेता येणार आहे. या संपूर्ण पॅकेजमध्ये जेवणाची आणि राहण्याची सुविधा देण्यात आली आहे.