या वेबसाइटवरून खरेदी करू नका विमा उत्पाद

विमा नियामक प्राधिकरण आयआरडीएने सामान्य जनतेला धोक्याची सूचना देत बोगस वेबसाइट्स आणि ईमेल आयडीपासून वाचून राहण्याचा सल्ला दिला आहे. असे न केल्याने लोकं धोक्यात येण्याची शक्यता वाढू शकते. इरडाच्या नावाखाली या वेबसाइट विमा विकत आहेत जेव्हाकी इरडा या प्रकारचं कुठलंही काम करत नाही.
 
इरडाने सार्वजनिक सूचना देत लोकांना अपील केली आहे की www.irdaionline.org नावाच्या वेबसाइटहून कोणत्याही प्रकाराचा विमा उत्पाद खरेदी करू नका. इरडाने म्हटले की ती अशा प्रकाराच्या कोणत्याही वेबसाइटचं संचालन करत नाही.
 
इरडा केवळ दोन वेबसाइटचे संचालन करते. www.irdai.gov.in आणि www.irdaonline.org। या दोन वेबसाइट्सवर प्राधिकरणाद्वारे निर्धारित नियम आणि परिपत्रक इतर माहिती उपलब्ध असते. प्राधिकरणाचा कोणताही अधिकारी कोणत्याही प्रकाराची विक्री करत नाही. अधिकारी प्रिमियम गुंतवणूक आणि बोनस याबद्दल देखील चर्चा करत नाही. एखाद्या व्यक्तीला इरडाहून फोन कॉल आल्यास याबद्दल लगेच पोलिसांकडे तक्रार द्यावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती