Viswas Swaroopam नाथद्वारामध्ये जगातील सर्वात उंच शिव प्रतिमा विश्वास स्वरूपम

Webdunia
सोमवार, 14 एप्रिल 2025 (07:30 IST)
भारत देशाला अनेक प्राचीन संस्कृती लाभलेली आहे. तसेच प्राचीन संस्कृतीचा वारसा तर आपल्या भारतात जपला जातोच पण आधुनिक युगानुसार नवनवीन कला आत्मसात करून त्यामधून सुंदर अशी कलाकृती देखील साजरी केली जाते. तसेच आजकाल भारतवर्षामध्ये नवनवीन पर्यटनस्थळ विकसित केले जात आहे.चेच उत्तम उदाहरण म्हणजे नाथद्वारा मधील जगातील सर्वात उंच शिव प्रतिमा विश्वास स्वरूपम
 
राजस्थान राज्यामध्ये उदयपूर पासून काही किलोमीटर अंतरावर राजसमंदच्या जवळ नाथद्वारा नावाचे एक सुंदर आणि भव्य पर्यटन स्थळ आहे. नाथद्वारामध्ये जगातील सर्वात उंच शिव प्रतिमा विश्वास स्वरूपम साकारण्यात आली आहे. भगवान शंकरांना समर्पित असलेले हे स्थान खूप सुंदर विकसित केले आहे. इथे भगवान शंकरांची जगातील सर्वात उंच आणि भव्य, देखणी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. मूर्तीचे रूप खूपच आकर्षक आणि भव्य आहे. भगवान शिव बर्फाच्या खडकावर बसलेले आहेत आणि आकाशाकडे पाहत मंद हसत आहेत. सुमारे 20 किलोमीटर अंतरावरूनही ही मूर्ती दिसते.  
 
उदयपूरहून नाथद्वाराच्या दिशेने येतांना ही मूर्ती लांबूनच दिसायला लागते. संपूर्ण श्रद्धेचे स्वरूप म्हणून मंदिर परिसर विस्तीर्ण परिसरात पसरलेला आहे. तसेच महादेवांच्या पुढे भव्य असा नंदी देखील साकारण्यात आला आहे. 
 
तसेच हा परिसर खूप मोठा आहे. त्याला पूर्णपणे भेट देण्यासाठी तुम्हाला बराच वेळ द्यावा लागेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही लिफ्टनेही पुतळ्याच्या माथ्यावर पोहोचू शकता. जिथून लांब अंतराचे दृश्य दिसते. तसेच या परिसरात पाहण्यासारखे पुष्कळ काही आहे. तसेच दाट गर्द हिरवे उद्यान देखील आहेत त्यामध्ये वेगवगेळे फुले आहेत. तसेच गुलाबाचे अनेक प्रकार या उद्यानात पाहावयास मिळतात.
 
तसेच संध्याकाळच्या वेळी येथील मुख्य आकर्षण म्हणजे लाइटिंग आणि लेजर शो तुम्ही पाहू शकतात.
हा शो कमीतकमी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतो. हा खूप अविस्मरणीय शो आहे.  
 
तसेच शंकरांच्या मूर्तीवर सर्व चित्रित करण्यात आले आहे. लेजर तंत्रज्ञानाच्या मदतीने खूप सुंदर चित्रित केले गेले आहे. जीवनात एकवेळ तरी नक्कीच भेट भव्य आणि अविस्मरणीय नाथद्वाराला द्यावी. 
 
तसेच जर तुम्ही उदयपूर यात्रा करीत असाल तर एक दिवसात तुम्ही नाथद्वारा नक्कीच जाऊ शकतात.
येथील टिकिट दर पार्क भ्रमणसाठी 200 आहे. तुम्हाला काही विशिष्ट प्रदर्शन आणि पुतळ्यांच्या शीर्षस्थानी जायचे असल्यास. तर तिकीट प्रति व्यक्ती सुमारे 400 रुपये आहे. तुम्ही आत इतर अनेक गोष्टी करू शकता. त्यांचे दर वेगळे आहेत. जसे लहान मुलांचे झुले, खाद्यपदार्थांची रेस्टॉरंट इत्यादी आहे. 
 
नाथद्वारा कसे जावे – तुम्ही उदयपूर परिवहन किंवा राजसमंद बसने देखील इथं पर्यंत पोहचू शकतात, तसेच खाजगी वाहन, टॅक्सी ने देखील जाऊ शकतात.  
 
विमान सेवा- विमान मार्गाने जायचे असल्यास उदयपूर विमानतळावर उतरून तिथून टॅक्सी करून तुम्ही जाऊ शकतात. 
 
रेल्वे मार्ग- उदयपूर रेल्वे स्टेशपासून तुम्ही खाजगी वाहन किंवा टॅक्सी, बस ने देखील नाथद्वारा पर्यंत पोहचू शकतात. 

संबंधित माहिती

पुढील लेख