India Tourism : भारतात भगवान शिवाच्या अनेक मोठ्या सुंदर अश्या प्रतिमा आहे. अनेक जण भोलेनाथांची भक्ती करतात. तसेच या मोठ्या सुंदर अश्या प्रतिमा पाहण्यासाठी अनेक पर्यटक दरवर्षी ठीक ठिकाणी भेट देतात. तशीच एक भव्य आणि अद्भुत, सुंदर उंच शिवाची मूर्ती सुरत मध्ये तापी नदीच्या किनाऱ्यावर स्थापन केली आहे. या मंदिराला गलतेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे दृश्य खूपच सुंदर आहे. तसेच हे सुरतमधील सर्वात सुंदर मंदिरांच्या यादीत येते.
सुरतमधील गलतेश्वर महादेव या मंदिरातील महादेवाची मूर्ती प्रचंड मोठी आणि सुंदर आहे. जी अनेक पर्यटकांना आकर्षित करते. मंदिराच्या बाजूला तापी नदी वाहते. मंदिरात भाविकांसाठी एक मोठा तलाव देखील बांधण्यात आला आहे, जिथे भाविक स्नान करून आशीर्वाद घेऊ शकतात. यासोबतच, मंदिर परिसरात देवाशी संबंधित अन्नपदार्थ आणि मूर्ती आणि पूजा साहित्य उपलब्ध आहे.
तसेच येथील महादेवाची मूर्ती ही 62 फूट उंच आहे. गलतेश्वर महादेव मंदिर सुरतपासून सुमारे 40 किमी अंतरावर तापी नदीच्या काठावर आहे. तसेच गुजरातमधील भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. अनेक पर्यटक या अद्भुत मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येथे दाखल होत असतात.
गलतेश्वर महादेव मंदिर सुरत जावे कसे?
गलतेश्वर महादेव मंदिर सुरतपासून सुमारे 40 किमी अंतरावर आहे. सुरत हे जंक्शन असून सुरत मध्ये जाण्यासाठी अनेक शहरांमधून रेल्वे सेवा आणि बस सेवा उपलब्ध आहे. सुरत मध्ये पोहचल्यानंतर कॅब
ऑटोच्या मदतीने मंदिरापर्यंत सहज पोहचता येते.