कोल्हापूरमधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

बुधवार, 22 जानेवारी 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील नैऋत्य दिशेला पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले कोल्हापूर हे शहर महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. जे चप्पल, दागिने आणि पाककृतींसाठी लोकप्रिय पर्यटनस्थळ ठिकाण बनले आहे. कोल्हापूर हे प्राचीन संस्थानांपैकी एक आहे ज्याला मराठा काळापासूनचा समृद्ध वारसा लाभलेला आहे.  पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, कोल्हापूर हे समृद्ध शहर आहे. किल्ल्यांपासून ते मंदिरांपर्यंत, वन्यजीव अभयारण्यांपासून ते तलाव आणि उद्यानांपर्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे. यामुळेच दरवर्षी हजारो पर्यटक   येथे भेट देण्यासाठी येतात.

कोल्हापूरचा इतिहास-
कोल्हापुर संस्कृतीचा इतिहास खूप मनोरंजक आहे. या शहरावर यादव, मराठा, राष्ट्रकुट आणि चालुक्य अशा अनेक भारतीय राजवंशांनी राज्य केले. तसेच मराठ्यांच्या राजवटीत हे शहर प्रामुख्याने समृद्ध झाले, जेव्हा ते विविध कला, संगीत, नृत्य आणि क्रीडा यांचे सांस्कृतिक केंद्र बनले. तसेच ऐतिहासिक कोल्हापूर शहर हे विविध संस्कृती आणि परंपरांचे मिश्रण आहे. तसेच कुस्ती हा या प्रदेशातील सर्वात महत्त्वाचा खेळ आहे. तसेच या समृद्ध कोल्हापूर मध्ये पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहे जी दरवर्षी अनेक पर्यटकांना आकर्षित करतात.
ALSO READ: महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी एक प्राचीन देवगिरी किल्ला दौलताबाद
कोल्हापूर पर्यटन

पन्हाळा किल्ला-
कोल्हापूर शहरातील पन्हाळा किल्ला हे कोल्हापूरचे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जे कोल्हापूरपासून 20 किमी अंतरावर आहे. या किल्ल्याचे भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांमध्ये स्थान आहे. तसेच 12 व्या शतकाच्या उत्तरार्धात राजा भोज यांनी बांधलेल्या पन्हाळा किल्ला दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करतो.   

महालक्ष्मी मंदिर-
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले महालक्ष्मी मंदिर हे देवी लक्ष्मीला समर्पित असून हे कोल्हापूर मधील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. महालक्ष्मीला देवी अंबाबाई म्हणूनही ओळखले जाते, जी स्थानिक लोकांसाठी तसेच विविध भागातून येणाऱ्या भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. महालक्ष्मी मंदिर हे चालुक्य शासकांनी 7 व्या शतकात बांधले होते.

दाजीपूर वन्यजीव अभयारण्य-
दाजीपूर वन्यजीव अभयारण्य हे निसर्ग प्रेमींसाठी कोल्हापूरमधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. या अभयारण्यात  बायसन, बिबट्या, वाघ, अस्वल, हरण यासारख्या विविध वन्यजीव प्रजाती पाहता येतात. दाजीपूर वन्यजीव अभयारण्य हे कोल्हापूरच्या महाराजांचे शिकार करण्याचे ठिकाण होते जे 1985 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते.   

श्री छत्रपती शाहू संग्रहालय-
कोल्हापूरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा प्रवास सुरू करण्यासाठी श्री छत्रपती शाहू संग्रहालय हे एक चांगले ठिकाण आहे. हा राजवाडा 1877-84 मध्ये बांधण्यात आला होता आणि तो छत्रपती शाहू महाराजांचे निवासस्थान आहे. राजवाड्याच्या तळमजल्याचे आता संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. याच प्रमाणे कोल्हापूर मध्ये  गगनबावडा, रामतीर्थ धबधबा, कोपेश्वर मंदिर, सागरेश्वर हरण अभयारण्य, रंकाळा तलाव, ज्योतिबा मंदिर इत्यादी पर्यटन स्थळांना दरवर्षी अनेक पर्यटक भेट देण्यासाठी कोल्हापूरमध्ये दाखल होतात.

कोल्हापूर जावे कसे?
कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्टेशन आहे जे मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज-कोल्हापूर विभागात आहे. कोल्हापूर रेल्वेमार्ग हा मुंबई, नागपूर, पुणे, तिरुपती यासारख्या शहरांना जोडलेला आहे. रेल्वे स्टेशनवर वरून येथून स्थानिक वाहनांच्या मदतीने पर्यटनस्थळी जाऊ शकता. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शेजारील शहरांशी चांगले जोडलेले आहे. कोल्हापूर हे मुंबई आणि बंगळुरूला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 4 वर वसलेले आहे. तसेच कोल्हापूरला जाण्यासाठी परिवहन मंडळाच्या सरकारी बसेस देखील आहे. कोल्हापूरला जाण्यासाठी खाजगी बसेस देखील आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती