श्री गणेश मंदिर सीताबर्डी नागपूर

गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (07:12 IST)
महाराष्ट्रातील नागपूर शहरामध्ये मध्यवर्ती स्थित सिताबर्डी नावाच्या टेकडीवर एक सुंदर असे गणपती मंदिर आहे. टेकडीवर श्री गणेशाचे मंदिर आहे जे बुद्धीचे देवता गणपती बाप्पा यांना समर्पित आहे. तसेच मंदिरात विशाल वृक्षाच्या मुळाशी असलेले हे गणपती मंदिर आहे. तसेच हे गणपती मंदिर नागपूरकरांचे आराध्य दैवत आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होते. या मंदिरातील गणपतीची पूजा नागपुरचे भोसले संस्थान करायचे. भोसले राजा गणपतीचे दर्शन करण्यासाठी या टेकडीवर जायचे. विदेशी आक्रमणांमध्ये हे मंदिर उध्वस्त झाले होते. काही काळानंतर वर्ष 1866 मध्ये गणपती बाप्पांची ही मूर्ती पुन्हा मिळाली. व इथे मंदिर निर्माण करण्यात आले. माघ महिन्यातील चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. तसेच लाखो भक्त इथे दर्शन करण्यासाठी येतात. तसेच येथील गणपतीची मूर्ती विदर्भातील आठ गणपती पैकी एक आहे.
 
इतिहास-
सीताबर्डी परिसराच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये इंग्रज आणि भोसले यांच्यामध्ये युद्ध झाले होते. यांमधील असे सांगण्यात येते की, भोसले राजा गणपतीचे दर्शन करण्यासाठी या टेकडीवर जायचे. यामंदिरामध्ये 350 वर्ष प्राचीन गणपतीची मूर्ति आहे. ही मुर्ती पिंपळाच्या विशाल वृक्षाखाली स्थापित आहे. या मंदिरात एकाच वेळी भगवान विष्णू आणि श्री गणेश यांचे दर्शन आणि पूजा करण्याचे सौभाग्य लाभते. 
 
तसेच हे गणपती मंदिर नागपूरवासियांचे आराध्य दैवत आहे. इथे हजारोंच्या संख्याने भक्त दर्शनासाठी येतात. तसेच अंगारिका चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, माघी चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. तसेच 10 दिवसीय गणेश उत्सवामध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सामान्य लोकांपासून तर सेलिब्रेटी पर्यंत भक्त इथे दर्शनाला येतात. टेकडीवरील गणेश मंदिरात आरती दिवसातून चार वेळेस केली जाते. तसेच येथील आरतीला सर्व जातीधर्माचे लोक उपस्थित राहतात. हेच येथील मुख्य आकर्षण आहे.  
 
सीताबर्डी गणपती मंदिर नागपूर जावे कसे?
नागपूर शहरामध्ये गेल्यानंतर मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी खासगी वाहन सहज उपलब्ध होते. तसेच रेल्वे मार्गाने जायचे असल्यास नागपूर जंक्शन अनेक रेल्वे मार्गाला जोडलेला आहे. तसेच विमान मार्गाने जायचे असल्यास नागपूरमध्ये देखील विमानतळ आहे. इथून रिक्षा किंवा कॅब च्या मदतीने सहज मंदिरापर्यंत पोहचता येते.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती