आरोग्याला द्या अधिक प्राधान्य, योगा येईल कामी
निरोगी जीवनाची गुरुकिल्ली, म्हणजे रोजच्या आयुष्यात लावायलाच हवी योगाची हजेरी
मनाला अधिक आनंदी करूया, योगाकडे वळूया
आरोग्यासाठी फायदेशीर आणि गुणकारी आहे योग, लाभ घ्यायलाच हवा रोज
आयुष्य करायचे असेल निरोगी आणि आनंदी, योगाचा ध्यास घ्या मनोमनी
योग आहे आरोग्यासाठी क्रांती, नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती
नियमित करा योगाचा सराव, आरोग्याला द्या कायम सराव
योग असेल जेथे, रोग नसेल तेथे
सकाळ अथवा संध्याकाळ, रोज करा योग
जीवनाचे करायचे असेल सार्थक तर योगाभ्यास हवा रोज
कधीही येणार नाही जवळ कोणताही रोग
योग असेल जिथे, आरोग्य वसेल तिथे
समाधान आणि संतोष ही सर्वात मोठी संपत्ती, मिळते केवळ योगपोटी
योगाशिवाय मनःशांती नाही, योग असेल तिथे रोग नाही