भारतीय हॉकी संघाने एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करत एफआयएच प्रो लीगमध्ये आयर्लंडचा 3-1 असा पराभव केला. आठव्या मिनिटाला आयर्लंडच्या जेरेमी डंकनने मैदानी गोल केला पण हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले.
22 व्या मिनिटाला मनदीप सिंगने मैदानी गोल करून बरोबरी साधली. नंतर, जर्मनप्रीत सिंग (45 व्या मिनिटाला) आणि सुखजीत सिंग (58 व्या मिनिटाला) यांनी पेनल्टी कॉर्नरवरून गोल करून भारताचा विजय निश्चित केला. शनिवारी, भारतीय संघ त्याच आयर्लंड संघाविरुद्ध परतीचा सामना खेळेल. भारतीय संघाचे आतापर्यंत पाच सामन्यांत नऊ गुण आहेत आणि तो पाचव्या स्थानावर आहे.
शुक्रवारीही एफआयएच प्रो लीगमध्ये निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली, कारण त्यांना जर्मनीकडून 0-4 असा पराभव पत्करावा लागला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर्मनीने सामन्यावर नियंत्रण ठेवले. त्यांच्याकडून एमिली वॉर्टमन (तिसरा मिनिट) आणि सोफिया श्वाबे (18वा, 47वा मिनिट) यांनी तीन मैदानी गोल केले. त्यानंतर 59 व्या मिनिटाला जोहान हॅचेनबर्गने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला.
या सामन्यात जर्मनीला 10 पेनल्टी कॉर्नर मिळाले तर भारताला फक्त दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. भारताचा पुढचा सामना शनिवारी पुन्हा जर्मनीविरुद्ध होईल. भारत चार सामन्यांतून सहा गुणांसह नऊ संघांच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे, तर जर्मनी सहा सामन्यांतून सात गुणांसह त्यांच्यापेक्षा एक स्थान वर आहे.