स्पेनचा तरुण टेनिसपटू कार्लोस अल्काराज विम्बल्डनमध्ये जेतेपदाची हॅटट्रिक हुकला. अल्काराजला चार सेटच्या सामन्यानंतर अंतिम फेरीत यानिक सिनरकडून पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत 24 वेळा ग्रँड स्लॅम विजेता नोवाक जोकोविचला हरवून सिनेरने अंतिम फेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा यानिक सिनर ऑल इंग्लंड क्लबमध्ये पहिल्यांदाच चॅम्पियन बनला आहे. विम्बल्डनपूर्वी सिनेरने तीन ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.
23 वर्षीय सिनेरने गतविजेत्या 22 वर्षीय स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्काराजला चार सेट चाललेल्या कठीण लढतीत 4-6, 6-4, 6-4, 6-4 असे पराभूत केले. पहिला सेट गमावल्यानंतर सिनेरने संयम सोडला नाही. त्याने पुढील तीन सेटमध्ये अल्काराजला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. हे सिनेरचे चौथे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.ब्रिटिश राजघराण्यातील सदस्य आणि वेल्सची राजकुमारी केट मिडलटन यांनी सिनरला ट्रॉफी सुपूर्द केली