भारताचे हरिकृष्णन ए रा हे भारताचे 87 वे ग्रँडमास्टर बनले आहेत. 24 वर्षीय हरिकृष्णन यांनी शुक्रवारी फ्रान्समधील ला प्लेन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात आपला तिसरा ग्रँडमास्टर नॉर्म गाठला आणि देशाचा 87 वा ग्रँडमास्टर बनला. हरिकृष्णन 2022मध्ये चेन्नई येथील ग्रँडमास्टर श्याम सुंदर मोहनराज यांच्या अकादमीत सामील झाले. हरिकृष्णन ग्रँडमास्टर झाल्यामुळे मोहनराज अत्यंत आनंदी आहेत