रशियामध्ये युद्धाविरोधात लोक रस्त्यावर उतरले, 1700 जणांना अटक

शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (14:27 IST)
युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधाचे आवाज खुद्द रशियातही उठू लागले आहेत. राजधानी मॉस्कोसह अनेक शहरांमध्ये लोकांनी युद्धाविरोधात निदर्शने केली. रशियन पोलिसांनी डझनभर शहरांमध्ये निदर्शने करणाऱ्या 1,700 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. मॉस्को टाईम्सच्या मते, दक्षिणेकडील तोल्यात्ती शहरापासून सुदूर पूर्वेकडील खाबरोव्स्क शहरापर्यंत निदर्शनेही झाली. याशिवाय राजधानी मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथेही निदर्शने करण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, एकट्या राजधानी मॉस्कोमध्ये 100 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या मरिना यांनी रशियन नागरिकांना युक्रेनमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईविरोधात मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे रशियातील आंदोलकांना इशारा देण्यात आला आहे. रशियन सुरक्षा दलांनी सांगितले की कोणतेही अनधिकृत मेळावे बेकायदेशीर आहेत. कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यास परवानगी नाही.
 
व्हाईट हाऊसबाहेर निदर्शने
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या आक्रमणाविरोधात अमेरिकेत अनेकांनी व्हाईट हाऊसबाहेर निदर्शने केली. आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पुतिन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती