रशियाच्या युक्रेशनवरील आक्रमणामुळे सोयाबीन, गहू आणि मक्याच्या किमतीत वाढ
शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (11:33 IST)
रशियाकडून युक्रेनविरोधात आक्रमणाची घोषणा झाल्यानंतर क्रूड ऑइल आणि सोने दरच नाही, तर गहू, सोयाबीन आणि मक्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
रशिया गव्हाचा मोठा उत्पादक देश असून आता युद्धामुळे जगभरातील गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या किमतीत वाढ झाली आहे.सोयाबीन आणि मका दरातही मोठी वाढ झाली आहे.
सोयाबीन दीड वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर ट्रेंड करत आहे. तर मागील 9 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर गव्हाची विक्री होत आहे. मक्याच्या किमतीतही वाढ झाली असून हा दर 33 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.