पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण 15 दिवसांपूर्वी बांगलादेशातून आले होते आणि त्यातील काही एका कापड कंपनीत काम करत होते. मानपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन बांगलादेशला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बनावट ओळखपत्र आणि कागदपत्रांच्या सहाय्याने हे लोक भारतात आले आणि डोंबिवलीत राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डोंबिवलीसारख्या मोठ्या शहरात अवैध बांगलादेशी नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. वेळोवेळी बांगलादेशींच्या अशाच अटकेच्या घटना घडतात. मात्र ही समस्या काही संपत नाही. मानपाडा पोलिसांच्या या कारवाईमुळे या बांगलादेशी नागरिकांना शहरात कोण एन्ट्री देतंय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.