राम मंदिराचे आंदोलन, संघर्ष सुरू होता तेव्हाही तुम्ही मातोश्रीत होता आणि आजही मातोश्रीतून प्रश्न विचारत आहात, आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

मंगळवार, 11 एप्रिल 2023 (21:29 IST)
बाबरी ढाचा पाडला तेव्हा कोण होतं हे विचारायचं झालं तर उद्धव ठाकरे कुठे होते? राम मंदिराच्या संघर्षाच्या काळात त्यांची भूमिका काय होती? स्वत: नामनिराळे राहायचे आणि दुसऱ्यांना प्रश्न विचारायचे. हे हवेचे बुडबुडे काढण्याचे प्रयोग, धंदे बंद करा. ज्यावेळी राम मंदिराचे आंदोलन, संघर्ष सुरू होता तेव्हाही तुम्ही मातोश्रीत होता आणि आजही मातोश्रीतून प्रश्न विचारत आहात अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
 
आशिष शेलार म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी व्यापक भूमिका त्यावेळच्या कारसेवकांसाठी घेतली हे खरे आहे. बाळासाहेबांनी रामजन्मभूमी अभियनात सकारात्मक भूमिका घेतली. या सगळ्यांचा अभियनात नक्की उपयोग झाला. हिंदू साधुसंत, विविध संघटना यांनी चालवलेल्या आंदोलनात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका मोठी होती. पण त्यांच्या जीवावर आज उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारावा त्याआधी तुम्ही कुठे होता याचे उत्तर द्या असं शेलारांनी सांगितले.

Edited By-Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती