धोनी पुढे खेळणार की आयपीएल 2025 हा त्याचा शेवटचा मोसम असेल याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. CSK सीईओ विश्वनाथ यांनी खुलासा केला की कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला धोनी सर्व काही स्वतःकडे ठेवतो. धोनीने शेवटचा सामना चेन्नईत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, असेही ते म्हणाले. जोपर्यंत धोनीला खेळायचे आहे तोपर्यंत त्याच्यासाठी सीएसकेचे दरवाजे सदैव खुले असतील. असे ही ते म्हणाले.
सीएसकेने धोनीशिवाय, कर्णधार रुतुराज गायकवाड (18 कोटी), मथिशा पाथीराना (13 कोटी), शिवम दुबे (12 कोटी) आणि रवींद्र जडेजा (18 कोटी) यांना कायम ठेवले होते. पाच रिटेंशनमुळे, सीएसकेने 120 कोटी रुपयांच्या पर्समधून 65 कोटी रुपये खर्च केले होते. मेगा लिलावासाठी CSK कडे 55 कोटी रुपयांची पर्स उपलब्ध आहे.