तीर्थक्षेत्र जेजुरीत आज सोमवती अमावस्या यात्रेनिमित्त प्रचंड गर्दी झाली होती. सुमारे तीन लाखांवर भाविकांनी आज कुलदैवत खंडेरायाच्या देवदर्शन घेतले. आज सकाळी 11 वाजता देवाच्या मानकऱ्यांनी इशारात केल्यानंतर देवाचे खांदेकरी, मानकऱ्यांनी सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जयमल्हारच्या जयघोषात उत्सवमूर्तीची पालखी क-हा स्नानासाठी उचलली.