जम्मूतील पुंछ जिल्ह्यातील मेंढार येथे मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे लष्कराचे एक वाहन खोल खड्ड्यात पडले. या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाला, तर अनेक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. बचावकार्य सुरू असून जखमी जवानांना वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. या अपघाताला लष्कराने दुजोरा दिला आहे. नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता चुकल्याने खोल खड्ड्यात पडल्याचे बोलले जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील मेंढारच्या बालनोई भागात हा अपघात झाला. हा भाग LOC जवळ येतो. लष्कराचे वाहन जवानांना चौकीच्या दिशेने घेऊन जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ते नियंत्रणाबाहेर जाऊन खोल दरीत कोसळले. माहिती मिळताच लष्कराचे मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि खंदकातून जवानांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले.