जयपूर टँकर अपघातात जखमी दोघांचा मृत्यू, मृतांची संख्या 15 वर पोहोचली

मंगळवार, 24 डिसेंबर 2024 (16:43 IST)
Jaipur gas tanker accident: जयपूरमध्ये गॅस टँकर अपघातात गंभीर भाजलेल्या आणखी दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची एकूण संख्या 15 झाली आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.  
 
मिळालेल्या महतीनुसार आज सकाळी दोन जखमींचा मृत्यू झाल्याचे शासकीय एसएमएस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुशील भाटी यांनी सांगितले. ते म्हणाले की, अपघातात भाजल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या तिघांना काल डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या 18 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे, त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टर सुशील भाटी यांनी सांगितले की, एक-दोन जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यास त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येईल.
 
जयपूरच्या भांक्रोटा भागात जयपूर-अजमेर महामार्गावर शुक्रवारी पहाटे एलपीजीने भरलेल्या टँकरला ट्रकने धडक दिली. यामुळे भीषण आग लागली आणि 35 हून अधिक वाहने प्रभावित झाली. घटनेच्या दिवशी 11 जणांचा मृत्यू झाला होता आणि आता मृतांची संख्या 15 झाली आहे. त्याचबरोबर 18 गंभीर जखमींवर अजूनही उपचार सुरू आहे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती