दिव्यांग या शब्दाने लोकांचा दृष्टिकोन बदलला
लोढा यांनी पत्रात लिहिले आहे की, "शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींसाठी 'दिव्यांग' शब्दाचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवला होता आणि यामुळे दिव्यांग लोकांबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे." तसेच विधवांसाठीही 'गंगा भागीरथी' हा शब्द वापरण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात यावा.
मंत्री नंतर एका निवेदनात म्हणाले, "हा मुद्दा केवळ विचाराधीन आहे आणि या दिशेने कोणतीही कारवाई केलेली नाही." या संदर्भात विभागामध्ये योग्य ती चर्चा होईपर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही, अशी ग्वाही मी देतो.