उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक

Webdunia
सोमवार, 10 जुलै 2023 (21:19 IST)
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  2019 च्या निवडणुकीवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत ठाकरेंवर टीका केली आहे.
 
उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही. तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे काय कर्तृत्व आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवलं आहे, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
<

उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते मा. @Dev_Fadnavis यांचे काय कर्तृत्व आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य…

— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 10, 2023 >
उद्धव ठाकरे तुम्ही 2019 साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं तुम्ही वाहिलं हेही महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं सामान्य शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
 
 
घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही 100 कोटीची वसुली केली आणि महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


Edited By - Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

पुढील लेख