शिवसेनेच्या सत्तासंघर्षाचा निकाल 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने देताना 16आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळी घ्यावा असे, असे सुप्रिम कोर्टाने म्हटले होते. त्यानंकर राहून नार्वेकर यांनी यावर कोणताही निर्णय न देता वेळकाढूपणा केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्य़क्षांवर नाराजी व्यक्त करून एका आठवड्याच्या आत याची सुनावणी करून निकाल द्या असे निर्देश दिले आहेत.
आपल्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे कि, “हे न्यायालय विधानसभा अध्यक्षांचा नेहमीच आदर करत आले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रतिष्ठाही विधानसभा अध्यक्षांनी राखावी, अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्याच्या आत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची करावी असे आम्ही निर्देश देतो.” असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रकात म्हटले आहे.