सुरुवातीच्या सामन्यांप्रमाणेच पुरुष एकेरीतही लक्ष्य सेनने अंतिम फेरीत वर्चस्व गाजवले आणि सय्यद मोदी बॅडमिंटनचे विजेतेपद प्रथमच जिंकले. लक्ष्यने आपल्या दमदार कामगिरीने सामना पूर्णपणे एकतर्फी केला. दुसरीकडे, सिंगापूरचा चौथा मानांकित खेळाडू जिया हेंग जेसन तेह फॉर्मात नव्हता. लक्ष्यने हा सामना 21-7, 21-7 असा जिंकून पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.