मीरा-भाईंदर येथे पोटच्या मुलीसह आईनं संपवलं जीवन

Webdunia
शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (22:22 IST)
मीरा भाईंदर येथे एका आईने तिच्या सहा वर्षाच्या पोटच्या मुलीसह आत्महत्या करून आपलं आयुष्य संपविण्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गौरव गॅलॅक्सी नित्यानंद नगर, शांती गार्डन परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं आपल्या सहा वर्षाच्या मुलीला घेत इमारतीच्या टेरेस वरून उडी मारून आम्ह्त्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आई आणि लेकीचे मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविले असून प्रकरणाचा तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

संबंधित माहिती

पुढील लेख