आमच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत : एनसीबी

बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (22:24 IST)
अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी क्रुझवर केलेल्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेली अटक बनावट आहे. एनसीबीची कारवाई मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावर एनसीबीने पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, असं एनसीबीने म्हटलं आहे.
 
“सर्व पंचनामे कायदेशीररित्या करण्यात आले. स्वतंत्र साक्षीदारांना सामाविष्ट करण्याचं कायद्यात तरतूद आहे. प्रभाकर सेहल, किरण गोसावी, मनिष भानुशाली, ऑब्रेझ गोमेझ, आदील उस्मानी, वी. वेंगणकर अर्पणा राणे, प्रकाश बहादूर, शोएब फैझ, मुझम्मील इब्राहीम यांना साक्षीदार केलं. क्रुझवर केलेल्या कारवाईनंतर अजून चार ठिकाणी कारवाई करण्यात आली. प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आमच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत ते तथ्यहीन आहेत,” असं म्हणत एनसीबीने आरोप फेटाळून लावले.
 
“मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या एनसीबीने पथकाने क्रुझवर छापा मारला आणि आठ जणांना अटक केली. विक्रम चोकर, इश्मितसिंग चढ्ढा, अरबाज मर्चंट, आर्यन खान, मोहक जैस्वाल, मूनमून धमेचा, नुपूर सजिता, या सर्वांना घटनास्थळी पकडलं. या सर्वांकडे मोठ्या प्रमाणात कोकेन, मेफेड्रोन, चरस, हायड्रोपोनिक वीड, एमडीएमए सोबत १ लाख ३३ हजार रुपये जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीनुसार मोहक जैस्वालची पथकाने चौकशी केली. त्याने दिलेली माहितीच्या आधारे जोगेश्वरीमध्ये छापा टाकला. ज्यामध्ये अब्दुल कादीर शेख नावाच्या व्यक्तीला एक्सटीसी पिल्स आणि मेफेड्रोनसह ३ तारीखला अटक करण्यात आली,” अशी माहिती एनसीबीने दिली.
 
“इश्मितसिंग चढ्ढाची चौकशी केली असता त्याने माहितीनुसार गोरेगावमध्ये श्रेयस सुंदर नायरला चरससह अटक केली. मनिष राजगडीया तो शिपवर पाहुण्यांच्या स्वरुपात बोलावलं होतं. त्याच्याकडे हायड्रोपोनिक वीड सह अटक करण्यात आली. अविन साहू विक्री करत होता त्याला पण अटक केली. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या चार लोकांना गोपाल आनंद, समीर सेहगल, मानव सिंघल, भास्कर अरोरा या सर्वांना पुराव्यासह अटक करण्यात आली,” असं एनसीबीने सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती