Maharashtra News: दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे क्षेत्र शुक्रवारी दुपारी 2.30 च्या सुमारास चक्री वादळात रूपांतरित झाले आहे. तसेच तामिळनाडू व्यतिरिक्त, आंध्र प्रदेश, केरळ, पुद्दुचेरीसह जवळपासच्या राज्यांमध्येही चक्रीवादळ प्रभाव दिसून येईल.
मिळालेल्या माहितीनुसार फेंगल चक्रीवादळ आज संध्याकाळी तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता असून संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील राज्याच्या विविध भागांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. IMD च्या चक्रीवादळ विभागाचे प्रमुख यांच्या म्हणण्यानुसार, आज संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ तामिळनाडू किनारपट्टीपासून 300-350 किमी अंतरावर होते. तसेच तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, केरळ आणि अंतर्गत कर्नाटकातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि 30 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूच्या अंतर्गत भागात मुसळधार पाऊस पडेल.
तर 6 डिसेंबर रोजी सांगलीसह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रुपांतरित झाल्यास महाराष्ट्र राज्यात त्याचा परिणाम कमी होईल.