मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एका खत प्रकल्पात रिॲक्टरच्या स्फोटानंतर गॅस गळतीमुळे दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. खतनिर्मिती करणाऱ्या कारखान्यातील रिॲक्टरमध्ये झालेल्या स्फोटामुळे रासायनिक धूर निघत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कडेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणाले की, “गॅस गळतीमुळे युनिटमध्ये काम करणाऱ्या सुमारे 12 लोकांना त्रास झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात दोन महिला कर्मचारी आणि एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. इतर नऊ जणांवर उपचार सुरू आहे.