महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहे. महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहे. पण, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाबाबत आतापर्यंत सस्पेंस कायम आहे. त्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक सुरू होती. तसेच या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह भाजप अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. महायुतीची दुसरी बैठक आज मुंबईत होणार आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीमध्ये अद्याप बैठक सुरू आहे, मात्र यावेळी मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार असून भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांच्या प्रमुखांना उपपदाची ऑफर दिली जाणार असल्याचे मानले जात आहे