अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून टोला

गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (16:44 IST)
मुंबईतील आझाद मैदानातील सभेत बोलताना वारिस पठाण यांच्या विधानावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. 'शिवसेनेवर 'बांगड्या घातल्या आहेत का?' अशी टीका केली होती. त्या टिकेला प्रत्युत्तर देत राज्यमंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. यावादात मिसेस फडणवीस म्हणजे अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. 
 
कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपाच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे,” असं ट्विट अमृता यांनी केलं होतं. या ट्विटमुळे पुन्हा एकदा हा विषय शमण्याच नाव घेत नाही. 
 
शिवसेना प्रवक्त्या आणि विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांनी रिट्विट करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. प्रबोधनकार, मा. बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वारसा लाभलेले श्री. आदित्यजी ठाकरे यांनी आपले वडील मुख्यमंत्री झाल्यावर (गायनाचे) छंद पूर्ण केले नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा छंद जोपासला आहे, अशा शब्दात सणसणीत टोला अमृता फडणवीसांना लगावला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती