मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यात हाणामारी

बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (16:38 IST)
मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांमध्ये मंगळवारी तुंबळ हाणामारी झाली असून त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकावरही हल्ला करण्यात आला. या घटनेने पुन्हा एकदा मध्यवर्ती कारागृह चर्चेत आले आहे. धंतोली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
 
नावेद हुसेन खान रशीद हुसेन खान (४०) आणि मोहम्मद आजम असलम भट (४०) अशी आरोपी कैद्यांची नावे आहेत. नावेद हुसेन हा १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असून त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यापासून तो मध्यवर्ती कारागृहात आहे. मोहम्मद आजम याला खुनाच्या गुन्ह्य़ात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मोहम्मद आजमची वर्तणूक योग्य नसल्याने त्यालाही फाशी यार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास दोन्ही कैद्यांमध्ये वाद झाला व त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी सुरक्षारक्षक ईश्वरदास तुळशीराम बाहेकर (४४) रा. कारागृह वसाहत  गेले. त्यांच्यावर दोघांनी हल्ला केला. या प्रकाराची कारागृह प्रशासनाने धंतोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती