अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या समवेत काही मोजकेच नेता आणि आमदार आहे.आता शरद पवार यांनी एक्शन मोड घेतले आहे. त्यांनी आजपासून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून आज ते नाशिकात पोहोचले तिथे ते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहे. राज्यात सर्वत्र पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसात शरद पवार मुंबईहून नाशिकात जाण्यासाठी निघाले. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दरम्यान शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले असल्याचा फोटो सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे.
शरद पवारांचा पावसात भिजलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये "भाग गये रणछोड सभी, देख अभी खडा हूँ मैं, असे लिहिले आहे. सगळे पळकुटे पळून गेले तरी ही मी अजून उभा आहे, मी ना थकलोय, ना हरलोय रणामध्ये अटळपणे उभा आहे, म्हणत असे भाव मांडले आहे.