इंग्लंडचा संघ २९ मे पासून वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडचा हा स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे. वेस्ट इंडिज संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळवली जाईल. या काळात, सर्वप्रथम २९ मे पासून सुरू होणारी एकदिवसीय मालिका आयोजित केली जाईल. तसेच, इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोफ्रा आर्चर उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. आर्चर कधी मैदानात परतू शकेल याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. इंग्लंडची वैद्यकीय टीम पुढील दोन आठवड्यात त्याच्या दुखापतीचे पुनर्मूल्यांकन करेल आणि त्यानंतर तो कधी मैदानावर परतू शकेल हे ठरवले जाईल. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी आर्चरच्या जागी ल्यूक वूडचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे.