Pune : विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद होऊन हाणामारी

रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (17:49 IST)
सध्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या गटात हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्याच्या राजगुरूनगर येथे राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाले नंतर वादाचे हाणामारीत रूपांतरण झाल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राजगुरूनगरच्या बस स्थानकात ही घटना घडली आहे. 

राजगुरूनगरच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिकण्यासाठी खेड तालुक्यातील अनेक विद्यार्थी एसटी बस ने ये जा करतात. काही विद्यार्थ्यांनी मुलींची छेड काढली छेडखानीच्या प्रकारामुळे विद्यार्थिनी देखील त्रासलेल्या आहे. या प्रकरणी मुलींनी कोणाकडेही तक्रार केली नाही. या मुळे काही विद्यार्थ्यांनी आक्षेप केला. आणि बाचाबाची होऊन हाणामारीची घटना घडली आहे. पोलीस या कडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत आहे. 

या पूर्वी देखील हाणामारीच्या घटना घडल्या आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या कडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. 
 
 Edited by - Priya Dixit   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती