या प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी नगरसेवक संजय बाबुराव गाडे (वय 57 रा. गोविंदपुरा, यशवंत कॉलनी, अहमदनगर) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली.त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. छाप्या दरम्यान पोलिसांनी देहविक्री करणार्या दोन महिलांची सुटका केली होती.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजु सलीकचंद सौदे (वय 59 रा. गोविंदपुरा, यशवंत कॉलनी, अहमदनगर) व संजय बाबुराव गाडे यांच्याविरूध्द स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.