मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना पोलिसांनी बजावली नोटीस

शनिवार, 23 एप्रिल 2022 (09:38 IST)
मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. रमजान महिना सुरू असतांना भोंग्यावरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ही नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे. ही नोटीस सीआरपी कलम १४९ प्रमाणे सरकार वाडा पोलिसांनी बजावली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर दातीर हे नवीन पोलिस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी नमाज पठणापूर्वी १५ मिनिटे आणि पठणानंतर १५ मिनिटे हनुमान चालीसा न वाजवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशांना न जुमानता आम्ही हनुमान चालीअसा लावू असा पवित्रा घेतला होता. आम्ही पोलीस आयुक्त नव्हे तर राज ठाकरेंचे आदेश पाळतो असे वक्तव्य दातीर यांनी केले होते. त्यामुळे ही नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती