सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; अभोण्यातील घटनेने हळहळ, हे आहे धक्कादायक कारण

शनिवार, 23 एप्रिल 2022 (09:24 IST)
नाशिक जिल्हा आणि कळवण तालुक्यातील अभोणा येथील माहेरवाशीण आणि चाळीसगाव येथील रहिवासी विशाखा शैलेश येवले-वेढणे (वय २६) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अभोणा येथे रात्री नऊ ते बाराच्या सुमारास संताजी चौक येथील राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील मागच्या खोलीत ही घटना घडली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले असून तिने लिहिलेली चिठ्ठीही सापडली आहे. 
 
अभोणा पोवलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ महिन्यांपूर्वीच(१३ जुलै २०२१)रोजी तिच्या कुटुंबीयांनी कळवण येथे थाटामाटात विवाह करून दिला होता.मयत विशाखाचे भाऊ तन्मय नरेंद्र वेढणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिचे पती शैलेश रमेश येवले यास इस्कॉन धार्मिक संस्थेत मोठे होण्यासाठी संन्यास घ्यायचा होता.’तुझ्याशी फक्त हळद लावण्या पुरतेच लग्न केले आहे.तुझ्याशी कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवता येणार नाही.तू येथे राहू नको,येथून निघून जा व आम्हाला मोकळे कर’.असे वारंवार बोलून सासरे रमेश महादू येवले,सासू रंजना रमेश येवले सर्व राहणार घाटरोड चाळीसगाव(ता.चाळीसगाव)जिल्हा जळगाव.यांचेवर मानसिक त्रास देऊन,छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.तपासा दरम्यान मयत विशाखा हिने इंग्रजीत लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली.उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड याच्या निर्देशानुसार व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भोईर पुढील तपास करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती