राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, परीक्षा २० सप्टेंबरला होणार

सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (17:17 IST)
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे  एमपीएससीकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा आता ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा २० सप्टेंबरला घेण्यात येणार होती.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर २०२०  व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहेत. तर राज्यसेवेची पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. 
 
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयोगाकडून उमेदवार  व परीक्षा आयोजनातील सर्व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारे उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती