दहावीची परीक्षा ६ ते २३ ऑक्टोबरदरम्या होणार आहे. बारावीची परीक्षा ६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान, तर व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ६ ते २४ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा १ ते २३ ऑक्टोबर तर दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयाची लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बारावीची प्रात्याक्षिक, लेखी व श्रेणी परीक्षा १ ते २९ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. संभाव्य वेळापत्रकाबाबत अभिप्राय, सूचना व दुरुस्त्या ईमेलद्वारे १७ ऑगस्टपर्यंत
[email protected] या मेलवर पाठवण्याच्या सूचना मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.