पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा

शनिवार, 18 डिसेंबर 2021 (21:33 IST)
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. 26 जानवारीपासून त्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. आत्ताच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत त्यामुळे, ही महाराष्ट्रातील काळी निवडणूक आहे, अशा शब्दात ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यावर पंकजा मुंडेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने इंपेरिकल डेटा द्यावा, असेही त्या म्हणाल्या आहेत. तसेच धनंजय मुंडेंवर टीका करताना, बीड जिल्ह्याचे रस्ते बघता बघता मला मणक्याचा आजार झाला. मी पालमंत्री असताना कोट्यवधींचा निधी दिला, मात्र दोन वर्षात काहीही निधी नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. राज्यात आघाडीचे सरकार असले तरी राज्यात केंद्र निधी द्यायला कमी पडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती