संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान, संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

शुक्रवार, 28 जून 2024 (21:41 IST)
संत तुकाराम महाराजांची पालकीने देहूतील मुख्य मंदिरातून आज 28 जून रोजी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केले आहे. 16 जुलै रोजी पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. या पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊ या.
 
संत तुकाराम महाराजांची पालकी शुक्रवारी 28 जून रोजी देहूतील मुख्य मंदिरातून पंढरपूर साठी निघाली पालखीचे मुक्काम इनामदार साहेब वाडा देहू असेल. 
29 जून रोजी पालखी चिंचोली -निगडी मार्गे निघणार असून मुक्कामाला विठ्ठल मंदिर आकुर्डी येथे असेल. 
30 जून रोजी पालखी पिंपरी-कासारवाडी मार्गावरून नानापेठ पुणे येथील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. 
1 जुलै रोजी पालखीचे मुक्काम संपूर्ण दिवस श्री निवडुंग विठ्ठल मंदिरात असणार. 
2 जुलै रोजी पालकी हडपसर मार्गे निघून लोणी काळभोरच्या नवीन पालखी तळावर मुकामाला असणार. 
3 जुलै उरुळी कांचन मार्गे निघून यवत पालखी तळावर मुक्काम असणार 
4 जुलै रोजी केडगाव चौफुला मार्गे वरवंड येथे श्री विठ्ठल मंदिरात मुक्काम 
5 जुलै रोजी पाटस मार्गे निघून उंडवंडी गवळ्याची पालखी तळावर मुकामाला असणार. 
6 जुलै रोजी बहाणपूर फाटा मार्गे निघेल आणि बारामतीच्या शारदा विद्यालयात मुक्काम असणार.
7 जुलै रोजी पालखी काटेवाडी मार्गे निघून सणसर पालजी तळावर मुक्कामाला असेल. 
8 जुलै रोजी बेलवंडी मार्गे निघेल बेलवंडीला पहिले गोल रिंगण होणार नंतर पालखीचे आंथुर्णे पालखी तळावर मुक्काम होणार. 
9 जुलै रोजी पालखी शेळगाव फाटा मार्गे निघून निमगाव केतकी पालखी तालावर मुक्कामाला असेल.
10 जुलै रोजी पालखी गोकुळीचा ओढा मार्गे निघेल इंदापूर येथे पालखीचे दुसरे रिंगण होणार नंतर इंदापूर पालखी तळावर मुक्काम करणार.
11 जुलै रोजी बावडा मार्गे पालखी निघणार आणि सराटी पालखी तळावर मुक्काम करणार. 
12 जुलै रोजी अकलूजच्या माने विद्यालयात पालखीचे तिसरे गोल रिंगण होणार नंतर पाळीचे मुक्काम इथेच असणार.
13 जुलै रोजी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होणार नंतर बोरगावला मुक्काम.
14 जुलै रोजी पालखी माळखांबी मार्गे निघेल आणि पिराची कुरोली गायरान पालखी तळावर मुक्काम असणार. 
15 जुलै रोजी पालखी भंडी शेगाव मार्गे निघून बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण होणार. पालखीचे वाखरी पालखी तळाला मुक्काम असणार. 
16 जुलै रोजी पालखीचे वाखरी मार्गे पंढरपूरला प्रस्थान होणार पंढरपुरात तिसरे उभे रिंगण होणार. पालखीचे पंढरपुरातील नवीन संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्काम असेल. 
17 जुलै रोजी आषाढी एकादशी श्री क्षेत्र पंढरपूरची नगर प्रदक्षिणा. आषाढी एकादशी नंतर पालखीचे परतीचे प्रवास सुरु होणार.       
 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती