यंदा संत तुकाराम महाराजांचा 339 वा पालखी सोहळा केला जात असून टाळ-मृदंगाच्या गजरात, जय हरी विठ्ठल नामाच्या घोषणेत संत तुकाराम महाराजांची पालखी देहूक्षेत्रातून शुक्रवारी 28 जून रोजी दुपारी 2 वाजता पंढरपूरच्या दिशेने निघाली. पालखीचा पहिला मुक्काम देहू गावातील इनामदार साहेबांच्या वाड्यात आहे.
शुक्रवारी पहाटे देहूच्या मुख्य मंदिरात महापूजा संपन्न झाली. नंतर वैकुंठगमन स्थान मंदिरात महापूजा करण्यात आली. तपोनिधी नारायण महाराज समाधीवर पूजा केली. तुकोबा महाराजांच्या पादुकांना चकाकी देण्यात आली नंतर त्यांना इनामदार वाड्यात आणण्यात आले. नंतर त्यांना मुख्यमंदिरासमोरील भजनी मंडपात आणण्यात आले. सकाळी 10 ते 12 या कालावधीत पालखी सोहळा सप्ताहाचा काला करण्यात आला नंतर मुख्य पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.