शनिवारी, 29 जून रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणि एडन मार्करामच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा संघ यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे.भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना ज्याप्रमाणे पावसाने व्यत्यय आणला होता, त्याचप्रमाणे अंतिम सामन्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे, असे आयसीसीने आधीच जाहीर केले आहे, परंतु पहिल्या दिवशी सामना खेळला जाणार नसेल तरच हा राखीव दिवस वापरला जाईल. आयसीसीच्या नियमांनुसार पहिल्या दिवशी किमान 10 षटकांचा सामना व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र, कोणताही T20 आंतरराष्ट्रीय सामना असेल तर किमान 5 षटकांचा सामना असणे आवश्यक आहे,पण टी-२० विश्वचषक उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत किमान 10 षटकांचे सामने होणे आवश्यक आहे.
हिल्या दिवशी दहा षटकांचा सामना देखील खेळला गेला नाही, तर तो सामना फक्त दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी खेळला जाईल. इतकेच नाही तर पहिल्या दिवशी सामना सुरू झाला आणि त्यानंतर सामना खेळता आला नाही आणि दुसऱ्या दिवशी गेला, तर पहिल्या दिवशी जिथे थांबला होता तिथूनच सामना सुरू होईल. फायनलसाठी 190 मिनिटांचा अतिरिक्त वेळही ठेवण्यात आला आहे, म्हणजे सामना तीन तास दहा मिनिटे अधिक चालू शकतो.
शनिवारी, सामना नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता होईल. त्याच वेळी, सामन्याचा पहिला चेंडू रात्री 8:00 वाजता टाकला जाईल. रविवारी राखीव दिवशीही सामना त्याच वेळी सुरू होईल. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी दहा षटकांचा सामनाही एकत्र खेळला गेला नाही तर अंतिम दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.